चंद्रा आणि निळ्या बेटावरची सफर ४४. नवा दोस्तत्या रात्री चंद्राला निवांत झोप लागली. सकाळी बऱ्याच उशिराने तो उठला. त्याला अगदी ताजेतवाने वाटू लागले. इथे उभे राहून सभोवार बघताना त्याच्या लक्षात आले की हे बेट बरेच मोठे आहे. बेटावर मध्ये मध्ये छोट्या टेकड्याही दिसत होत्या. एक गोष्ट सर्वत्र सारखी होती. झाडांच्या शेंड्याजवळची पाने निळसर होती. चंद्राच्या मनात असा विचार आला की हे निळे बेट तर नसावे ना! तसे असेल तर तो त्या रहस्यमयी बेटावर व त्या संदेश पाठवणाऱ्या अज्ञात माणसाजवळ पोहोचला होता.- सध्या त्याला तातडीने दोन-तीन गोष्टी कराव्या लागणार होत्या. एक म्हणजे तीर-कमठा तयार करणे, दुसरी गोष्ट म्हणजे होडी किंवा एखादा