चंद्रा आणि निळ्या बेटावरची सफर - 3

  • 6.4k
  • 3.7k

चंद्रा आणि निळ्या बेटावरची सफर३३. संकटाशी सामनाचंद्राला जाग आली तेव्हा त्याला जाणवले की त्याचे हात-पाय बांधलेले आहेत. त्याने सभोवार नजर फिरवली. आजूबाजूला उंच झाडांची गर्दी होती. ती सारी झाडे वेलींनी वेढलेली होती. वेलींना पेल्यासारखी निळसर-जांभळ्या रंगाची फुले होती. त्याचे लांब पुंकेसर फुलाच्या बाहेर डोकावत होते. पुंकेसर पिवळसर सोनेरी रंगाचे होते. फुलपाखरे, भुंगे व पाखरे त्याभोवती रुंजी घालत होते. त्याला ज्या ठिकाणी बांधलेले होते त्या सभोवताली गोलाकार जागा मुद्दामहून साफ केलेलीहोती. मध्ये एक सरळसोट झाडाचे गुळगुळीत केलेले खोड खांबासारखे रोवले होते. पण त्याहीपेक्षा भीतिदायक गोष्ट त्याच्या नजरेत आली ती म्हणजे त्या खांबाच्या बाजूला असलेली दगडाची विचित्र आकाराची भयंकर मूर्ती. अशा प्रकारची