चंद्रा आणि निळ्या बेटावरची सफर - 2

  • 8.1k
  • 4.4k

चंद्रा आणि निळ्या बेटावरची सफर२) सफरीवर त्या रात्री चंद्राला झोप येईना. झोपडीच्या बाहेर ओट्यावरच तो झोपायचा.समुद्री वार्यावर छान झोप यायची.पण आज समोर चांदण्यात चमकणारा समिंदर त्याला झोपू देईना. वेडा वारा, उसळत्या लाटा त्याला खुणावत लागल्या.अखेर न राहवून तो उठला आणि वाळूत जाऊन बसला.त्याच्या पाठोपाठ वाघ्याही त्याच्या पायापाशी येऊन बसला.पाण्यावर चमकणार्या लाटा बेभानपणे नृत्य करत होत्या.सळसळतं येणारा वारा त्याच्या अंगा-खांद्याला स्पर्श करत होता. चंद्राच्या मनात निळ्या बेटाने ठाणमांडले होते. त्याला साहस दाखविण्याची संधी आपोआपच चालून आलीहोती. त्या निळ्या बेटाच्या शोधात जाण्याचा त्याचा पक्का निर्णय झाला होता. पण जाण्याअगोदर सागरी प्रवासाची तयारी करायची होती आणि तीसुद्धा कुणाला कळू न देता. प्रश्न होता