मी पाहिलेला राम

  • 6.6k
  • 2.4k

स्वामी विवेकानंद म्हणतात, ‘अजून मानवजातीला जी आदर्श संस्कृती प्राप्त करून घ्यावयाची आहे, तिचे चित्रण करणारा व प्राचीन आर्य जीवनाचे दर्शन घडवणारा ज्ञानकोश म्हणजे रामायण!’ ‘वाल्मीकी रामायणा’त वर्णिलेल्या सद्गुणांमुळे श्रीराम सर्वसामान्यांचा व असामान्यांचाही आदर्श ठरला आहे. लहानपणापासून आपण राम आणि सीतेच्या गोष्टी ऐकत मोठे झालो. एकवचनी राम,एकपत्नी राम आज्ञा धारी राम अशी आदर्श रामाची रूप वाचत ,पहात आलो.मानव रूप घेऊन सुद्धा आपले वेगळेपण जपणारा "राम".रामा सारखा आपला ही पुत्र असावा अस कित्येकांना आज ही वाटत. रामाला लोकांनी आप आपल्या दृष्टिकोनातून पाहिले आहे. ज्याची जशी भक्ती ,तसा त्याचा राम! एक राजा असून ही त्याला वनवास भोगावा लागला. राम जितका धीरोदात्त ,संयमी,वीर,तशीच त्याला