ॲ लि बी. (प्रकरण ९)

  • 7.6k
  • 1
  • 4.4k

ॲलिबी भाग ९: प्रकरण ९पाणिनी पटवर्धन, पळशीकर रहात असलेल्या अपार्टमेंट च्या बाहेर टॅक्सीतून उतरला. दोन मोठाल्या सुटकेसेस ड्रायव्हरने डिकी मधून काढून खाली ठेवल्या. पाणिनी ने त्याला मीटर चे भाडे आणि टिप म्हणून आणखी थोडे पैसे देऊन खुश केले.त्याच्या सुटकेसेस वर डझन भर वेगवेगळया देशांचे आणि विमान कंपनीचे स्टीकर होते. एकंदरीत त्याचा अवतार मोठा प्रवास करून आलेल्या प्रवाशा सारखा दिसत होता. एक जाड माणूस टेबल खुर्ची मांडून बसला होता पेपर वाचनातून त्याने पाणिनी कडे पाहिले आणि पुन्हा पेपरात डोके खुपसले. “ मी इथे २ महिन्यासाठी रहायला आलोय. साधारण दहाव्या मजल्या पर्यंत मला जागा हवी आहे.कितीही भाडे असेल तरी चालेल., दुसरी गोष्ट,