संत श्री एकनाथ महाराज। १७

  • 5.9k
  • 2.1k

द्विपरार्धायु विधाता । त्याचेनि नोहे गुणभागता । मग इतरांची कोण कथा । गुण तत्त्वतां निवडावया ॥११॥ ऐशिया ज्या त्रिगुणवृत्ती । मजही निःशेष न निवडती । यालागीं ध्वनितप्राय पदोक्ती । देव श्र्लोकार्थीं बोलिला ॥१२॥ मागिल्या तीं श्र्लोकार्थीं । सांगीतल्या त्रिगुणस्थिती । त्रिगुणांची मिश्रित गती । सन्निपातवृत्ती ते ऐका ॥१३॥ एकनाथी भागवत - श्लोक ६ वा सन्निपातस्त्वहमिति ममेत्युद्धव या मतिः । व्यवहारः संनिपातो मनोमात्रेन्द्रियासुभिः ॥६॥ गुणसन्निपातप्रकारु । एकचि जो कां अहंकारु । तो गुणसंगें त्रिप्रकारु । ऐक विचारु तयाचा ॥१४॥ वर्णाश्रमविहित विलास । वेदाज्ञा पाळणें अवश्य । मी आत्मा जाण चिदंश । हा अहंविलास सात्विक ॥१५॥ मी स्वधर्मकर्मकर्ता । मी स्वर्गादि सुखभोक्ता