चंद्रा आणि निळ्या बेटावरची सफर - 1

  • 13.2k
  • 1
  • 7.2k

१ बाटलीतला संदेशदूरवर समोर पसरलेला अथांग सागर....पाण्याच्या उसळत्या लाटांवर चमकवणारे सायंकाळचे सूर्यकिरण...मध्येच लाटांवर हेलकावे खात डोलणार्या कोळ्यांच्या नावा...पाण्यात सूर मारत झेपावणारे समुद्रपक्षी अस छान दृश्य होत ते! जिथे आकाश व समुद्र एकमेकांना भेटत होते त्या ठिकाणी तर वेगवेगळ्या रंगाची गर्दी उसळली होती. लाल...गुलाबी...जांभळ्या रंगाची...सतत विविध असे सुंदर आकार धारण करणारी आकाश शिल्पे तिथे पसरली होती. कधी हत्तींचा आकार....कधी होडींचा आकार तर कधी......पर्वत हातावर घेऊन उडणाऱ्या रामभक्त हनुमंताचा आवेश दाखविणारादेखावा... किती सुंदर दृश्य होते ते. हा सारा देखावा किनाऱ्यावरच्या वाळूतहोडीला टेकून चंद्रा देहभान विसरून पाहात होता. मध्येच त्याचे लक्ष डाव्याबाजूच्या डोंगरकपारीमध्ये पाण्याच्या जोरदार लाटामुळे तयार झालेल्यागुहांकडे गेले. तिथे समुद्री लाटा किनाऱ्यावर