आमच्या सोसायटीच्या पारथे काका, अम्याचे बाबा, इरशाद चाचा आणि दुबे काकांना तुम्ही ओळखत असालच. उरलेल्या लोकांशी हळुहळु ओळख होईलच. तस येवढी वर्ष एकत्र चाळीत राहिल्यामुळे अचानक झालेल्या बदलांना आपल करन जरा कठिन होत. चाळीच्या घरचे दरवाजे उघडे असायचे. बिल्डिंगचे मात्र बंद. पण सवयी काही केल्या बदलल्या नव्हत्या. सोसायटीत तस मीनी इंडीया राहत होती. चाळीच्या जागेवर आता उंच टाॅवर बांधला होता. 4-5 लोकांनी रुम विकल्याने आता ते या नविन सोसायटीत दिसत नव्हते. पण चाळीतले बाकीचे सगळी कुटुंब मात्र आपल्या वाढवडीलांची जागा सोडायला तयार नव्हते. काही नवीन लोक हि राहायला आले. चाळ गेली बिल्डींग आली. नोकीया गेला स्मार्ट फोन आला आणि सोसायटीत