चुकीचे पाऊल! - १२

  • 7.8k
  • 4.1k

आता पर्यंत आपण बघीतले.ओंकार आणि शामल यांच्यावर कायद्यांच्या विविध कलमान्वये गुन्हे नोंदवण्यात आल्याची माहिती मला प्रियांका गावडे यांनी दिली. सोबतंच माझ्या चुकीच्या पावलांमुळे पोटात वाढत असलेल्या निष्पाप जीवाला जन्म घेण्याआधी जीव गमवावा लागला होता. प्रियांका गावडे यांनी माझ्यासाठी इतकी धडपड का केली? ह्या प्रश्नाच्या शोधात मी होते.आता पुढे..!प्रियांका गावडे यांचे नाव गूगल वर सर्च करताच त्यांच्या नावाची एक हायपरलिंक मला दिसली. त्यावर क्लीक करताच एका ब्लॉगस्पॉटचे नवीन पेज समोर उघडले. ज्यात त्यांनी विविध विषयांवर लिखाण केले असल्याचे मला समजले. त्यातंच "#Black_Side" या शीर्षकाखाली एक ब्लॉग मला सापडला. ज्यात त्यांच्या स्वतःच्या आयुष्यात घडलेल्या काळ्या बाजूचा उल्लेख त्यांनी अशाप्रकारे केला होता. "माझ्या