बावरा मन - 2

  • 13.8k
  • 7.7k

रिद्धी सकाळी पटकन रेडी होऊन डायनिंग रूम मध्ये येते... सगळे तिची वाट बघत होते.."Good Morning Dadu.. " रिद्धी यशवंतला मिठी मारून बोलते." Good Morning माऊ..." यशवंत तिच्या केसांवरुन हात फिरवतात.." चला नाश्ता करूया का मला खूप भूक लागली आहे..." सारारिद्धी चेअर वर जाऊन बसते ... सुधा ( कुक ) तिची प्लेट घेऊन येते... " वॉव... मसाला डोसा कोणी बनवला... " रिद्धी" दुसरं कोण असणार मॉम हो ना ... " अंकित" हो तिला आवडतात माझ्या हातचे डोसे... " रोहिणी" दादू दुपारी विकी येईल तुमच्या डान्स प्रॅक्टिस साठी तर सियाला बोलवून घे अजून कोणी असेल तिच्या घरचे तर त्यांना सांग... मी येईल