संत श्री एकनाथ महाराज १६ श्रीकृष्ण उध्दव संवाद काम ईहा मदस्तृष्णा सतम्भ आशीर्भिदा सुखम् । महोत्साहो यशः प्रीतिर्हास्यं वीर्यं बलोद्यमः ॥३॥ काम म्हणिजे विषयसोसू । जेवीं इंधनीं वाढे हुताशू । तेवीं पुरवितां कामाभिलाषू । कामअसोसू पैं वाढे ॥७७॥ या नांव काम जाण । कामक्रिया ते ईहा पूर्ण । झाले विद्येचा दर्प गहन । मदाचें लक्षण या नांव ॥७८॥ झालिया अर्थप्राप्ती । वासनेसी नव्हे तृप्ती । चढतीवाढती आसक्ती । तृष्णा निश्चितीं या नांव ॥७९॥ अतिगर्वें जे स्तब्धता । कोणा दृष्टीं नाणी सर्वथा । या नांव स्तंभावस्था । जाण तत्त्वतां उद्धवा ॥८०॥ अर्थप्राप्तीकारणें । इष्टदेवता प्रार्थणें । प्रापंचिक सुख मागणें । आशा