अॅलिबीभाग ७.ऑफिस मधे सौम्या त्याची वाटच बघत होती. “ कशी झाली मिटींग?” तिने पाणिनी आत येताच विचारले.“ त्या ब्रोकर ना मी चांगलंच काळजीत टाकलंय. आता तेच इन्स्पे.होळकर वर दबाव टाकतील टोपे च्या मृत्युची पूर्ण चौकशी करायला. आणि त्वरित करायला.”-पाणिनी“ मस्त झालं. बर कनक चा फोन येऊन गेला, तुम्हाला फोन करायला सांगितलाय त्याने. लाऊन देऊ का?”“ हो, दे जोडून.”“ पाणिनी, तू मला एक काम दिले होतेस. तुझ्या जाहिरातीला उत्तर द्यायला वर्तमान पत्राच्या ऑफिस मधे एक मुलगी गेली होती. तिथे एक पाकीट देऊन पुढे एका ब्युटी पार्लर मधे गेली आहे. माझा हेर तिच्या मागावर तिथेच बाहेर थांबलाय. तुला तिच्याशी बोलायचं असेल तर