वास्तव ..

  • 8.6k
  • 3k

मी दोन वाजता बस स्टॉपला ऊभी होती. दहा पंधरा मिनीटे होत आली तरी बस काही येत नव्हती मग मी एका मुलीच्या शेजारी जाऊन बसली. बसल्या बसल्या मी मोबाईलवर टाईमपास करत होती. तेवढ्यात समोर एक लहान मुलगा मळकट कपडे घालुन, माती संपुर्ण अंगाला लागलेला आला आणि माझ्या ड्रेसला हात लावुन एक हात पुढे करु लागला. मी त्याच्याकडे एक दोन सेकंद बघितलं, इकडे तिकडे नजर फिरवली तर पलीकडे त्याचा भाऊ पण हेच करत होता. मला खरंच राग आला, मला चिड आली. मी त्याला नाही म्हणुन मान हालवली. तो पुढे गेला त्याने परत पुढच्या मुलीच्या अंगाला हात लावला.. मला आता मात्र रहावलं नाही..