ते दोघे पु. ल. देशपांडे गार्डन ला आले. पु.ल. देशपांडे उद्यान पुण्यातील हे सिंहगड रोड वर असलेले एक उद्यान आहे. याची रचना जपानी उद्यानपद्धतीची आहे.पु.ल. देशपांडे उद्यान एकूण १० एकर परिसरामध्ये विस्तारले आहे. वर्षभरातल्या बदलत्या ऋतूंतील निसर्ग सौंदर्याचे स्वरूप लोकांना पहावयास मिळावे अशी या उद्यानाची रचना करण्यात आली आहे या उद्यानात फिरताना हिरवळ, तळी, पाण्याचे झरे, टेकड्या या सर्वांचा अनुभव घेता येतो. कॉफी, भात आणि अशा विविध वैशिट्यपूर्ण वनस्पतींची लागवड करण्यात आली आहे. या शिवाय तुळस आणि त्याच्या सारख्या अनेक औषधी वनस्पती येथे आहेत. गुलाब, तगरी पासून विविध शोभेची फुले या उद्यानाचे सौंदर्य खुलवतात. पाण्याचे झरे आणि विविध फुले यामुळे