ओंजळीत माझ्या... तू खूप काही देऊन गेलास...

  • 10.1k
  • 3.7k

कविता --- ओंजळीत माझ्या... तू खूप काही देऊन गेलास... ओंजळीत माझ्या...तू खूप काही देऊन गेलास...आठवते का तुला की, विसरलास...आठवत नसेल तर आठवण करून देऊ कामी... ओंजळीत माझ्या...तू खूप काही देऊन गेलास...आठवते का ती आपली पहिली भेट ....मी नाही विसरले त्या भेटी गाठी.....मी नाही विसरले ते मोहक क्षण....ज्यात फक्त होतो तू आणि मी... ओंजळीत माझ्या...तू खूप काही देऊन गेलास...आठवते का ती कातरवेळ..ज्यात तू तुझ्या मनातील भावना...मला जाहीर केल्या होत्या..विसरला असशील ना.. ओंजळीत माझ्या ...तू खूप काही देऊन गेलास...आठवते मला आजही तू पाहिलेली....माझ्या होकाराची वाट...होकार दिल्यानंतर तुझा तो...गगनात न मावणारा आनंद... ओंजळीत माझ्या ...तू खूप काही देऊन गेलास...सतत तुझा भास आभास होतो