चुकीचे पाऊल! - ०८

  • 8.7k
  • 1
  • 4.8k

आता पर्यंत आपण बघीतले.माझ्या पोटात, माझ्याकडून पडलेल्या चुकीच्या पावलांचा अंश कधीच उगम पावला होता! त्याच्या अस्तित्व निर्मितीची वास्तविकता मी प्रियांका गावडे यांना स्वतः सांगणार होते!आता पुढे..!जागेवरून उठत मी सांगायला सुरुवात केली."मॅडम, त्या रात्री जेवणं आटोपून सर्व उशिरापर्यंत झोपी गेले. मी माञ शामलच्या विचारात लोळत पडले होते. शामल, माझा आत्ये भाऊ! तो नोकरीच्या शोधात काही दिवसांसाठी आमच्या घरी राहायला आला होता. त्याचे विचार मला वेगळाच अनुभव करवून देत होते. पण, तेवढ्यात दारावर थाप पडली आणि मी भानावर आले. दार उघडले, तर शामल माझ्या खोलीबाहेर उभा होता. आम्हा दोघांना आतून एक वेगळीच ऊर्जा एकमेकांकडे खेचत असल्याचे जाणवले. थोडा वेळ आम्ही एकमेकांना बघत