स्वप्नांचे इशारे - 3

  • 7.5k
  • 3.6k

प्रिया प्रिया ....आईच्या आवाजाने प्रियाची झोप उघडते ...उठ ना बाळा आज ऑफिस ला जायचं ना, विसरलीस का ? आई बोलली ...म्हणत प्रिया ताडकन उठते आणि लगबगीने तयारी करते ..प्रिया खाली येते , देवघरा जवळ जावून देवांना नमस्कार करते ,तिच्या आई बाबांना नमस्कार करते...तितक्यात प्रीयाची आई नास्त्याची प्लेट लावते. प्रिया नाष्टा करून ऑफिस ला जायला निघते. तितक्यात तिची मैत्रीण केतकी तिची स्कूटी घेऊन येते ...चला निघायचं का प्रियु ? .....चल चल लवकर म्हणत प्रिया स्कूटी वर बसते.दोघी ऑफिस ला पोहचतात. ऑफिस चा पहिलाच दिवस म्हणून दोघीही आधी जोईनिंग फॉर्मलिटी पूर्ण करतात. नंतर त्यांना एका सिनियर कडून कामा बद्दल माहिती दिली जाते