स्वप्नांचे इशारे - 1

  • 13k
  • 6.3k

थंडगार हवा, नदीच्या पाण्याची मधुर धून, पाखरांची किलबिल, त्यात नदीच्या पाण्यात होणारा सूर्यास्त, अशा मस्त निसर्ग सानिध्यात बसली असताना अचानक तिचा डोळा लागतो. ती प्रिया अशीच निसर्ग सानिध्यात रमणारी आणि तिच्या होणाऱ्या राजकुमाराचे स्वप्न बघणारी. दिसायला अशी की जो बघेल तो तिच्या सौंदर्याच्या प्रेमात पडेल. गोरा वर्ण, काळे भोर लांब सडक केस, पाणीदार डोळे त्यावर तिचे ते स्मित हास्य.आताही तिच्या राजकुमाराच्या सप्नात हरवलेली, तो कोण असेल याचं विचारात गुंतलेली . स्वप्नात पाहिले तिने त्याला समोरून येताना रुबाबदार सुट बुट मधे गाडीतून उतरताना , ती टक लावून बघू लागली कोण आहे तो, कसा आहे तो ,त्याचा चेहरा दिसणार तेवढ्यात जोराचा पाऊस