ॲ लि बी. (प्रकरण ४)

  • 10.9k
  • 1
  • 5.6k

ॲ लि बी भाग ४कनक ला घेऊन पाणिनी शहराच्या दक्षिण बाजूला असलेल्या टेकडी च्या दिशेने गाडीने चालला होता.पुढे गेल्यावर आठ –दहा बंगली वजा घरांचा समूह दिसायला लागला.” या पैकीच एक बंगला असणार” ओजस म्हणाला.पाणिनीने अनुक्रमांक पाहिले आणि म्हणाला,” या रांगेतला शेवटचा दिसतोय. .. हाच तो.”बंगल्याचे तोंड आग्नेय दिशेला होते.त्याच्या वरील बाजूला पश्चिमेकडे टेकडीचे टोक दिसत होते तर पूर्वे कडे खालील बाजूस शहर पसरले होते, पांढऱ्या इमारतींवर सूर्य किरणे पडून त्या चमकत होत्या.वर तिरके लाल छत आणि त्याखाली स्वच्छः पांढऱ्या आणि उन्हात चमकणाऱ्या भिंती असे मनोहर दृष्य होते.घराची घंटा वाजवण्यापूर्वी पाणिनीने ते दृष्य मनात साठवून ठेवले.त्या प्लॉट चे जिथे दोन भाग