विमानजानबा काठी टेकत सावकाश चढ चढून वर आला.समोर सड्यावर काम चालू होत.अनेक भलेमोठे बूलडोझर ...रोलर....डंपर...तसच हेल्मेट घातलेले अनेक कामगार धावपळ करत होते.जवळपास शंभर एकरचा परीसर सपाट करण्याच काम चालू होत.जानबाने सारा परीसर न्याहळला. अनेक इंजिनिअर लाल पिवळा जॅकेट घालून धावपळ करत होते. मुख्य इंजीनियर एका खुर्चीवर बसला होता.जानबा त्याच्या जवळ गेला." विमान कवा येणार ?"" आजोबा, आत्ता कुठं काम सुरू झालय. अजून सहा सात वर्षे लागतील.""आर देवा...,! अगा रावणागत मिशिनी आणल्यात अन् सहा वरीस लागलं म्हणता?" जानबा उसासा सोडून म्हणाला. माळावर काम सुरू झाल्यापासून जानबा दर दोन तीन दिवसांनी येऊन ' विमान कवा येणार?' हा एकच प्रश्न तिथल्या माणसाना विचारायचा.सर्वांना