दिवाळी अवघ्या दोन दिवसांवर आली होती. घरात गडबड सुरु होती, आई घर साफ करायचं म्हणुन मागे लागली होती. मला घर साफ करायचं म्हणजे नको वाटायचं. पुर्ण घर आवरायचं, संपुर्ण दिवस त्यामध्ये घालवायचा....चिड यायची मला. आज काही करुन घर साफ करायचंच असं आई बाबांच रात्रीच ठरलेलं. त्यांनी रात्रीच जाऊन मदतीसाठी एका बाईला सांगितलं होतं. मी उठल्यापासुन चिडचिड करत होती. नेहमी काय करायची साफसफाई?? घरी तरी कोण येतं तुझ्या?? म्हणुन आईला मी टोमणे मारत होती.. काही वेळ मी आईसोबत बोललीच नाही.. आईने मला सर्व मांडणची भांडी खाली करायला सांगितली होती आणि मी ती रागात खाली करत होती. तेवढ्यात बाहेरून आवाज आला...ताई....ताई....मी