प्रेम कि वासना

  • 14.6k
  • 8.1k

सुर्य लगबगीने अस्ताला चालला होता. दिवसभर स्वतःसह अवघ्या सृष्टीला पोळल्यानंतर डोंगरापलिकडच्या आपल्या शीतल महालात कधी एकदा पोचतोय याची त्याला अतिशय घाई झाली होती. सारी सजीवसृष्टि आपापले दिनक्रम मालवण्यामागे गुंग होऊन आपापल्या घरट्यांकडे परतू लागली होती. अंधाराने हळुहळु आपले बस्तान आसमंतावर पसरवण्यास सुरूवात केली होती. पण आपल्या प्रियाला याचं काहीच सोयर सुतक नव्हतं. ती आपल्याच तंद्रीत किना-याकडे चालत येत होती. तिच्या उद्वीग्न मनात असंख्य प्रश्नांची वावटळं थैमान घालीत होती. समोरच्या शांत सागराचा तिच्या मनातल्या भावनांशी कधी संगम झाला तीचं तिलाच कळलं नाही अन् ती तिच्या परमसखीच्या म्हणजेच शितल वालूकेच्या कुशीत विसावली. तिच्याच भाषेत, म्हणजे नाजूक बोटांनी तिच्या मुलायम पाटीवर आपलं सारं