अग नको इतका विचार करू आय विल टेक केयर ऑफ मि ओके. चल आता काय गाल फुगवून बसली स्माईल प्लीज. मीतू त्याच्या कड़े पाहत हसली. त्याने तिला घरी सोडले तो ही त्याच्या घरी आला. मोहित चे आजोबा आणि वडील दोघेही राजकारणातच सक्रिय होते. त्याचे वडील दिनकरराव देशमुख माजी आमदार होते त्यांचा समाजकार्याचा आवाका ,गरीब आणि गरजू लोकांना मदत करण्याची त्यांची वृत्ती प्रामाणिक पणा संपूर्ण शहरात चर्चे चा विषय होता . त्यांनी राजकारण केले पण त्यात प्रामाणिक पणा आणि एकनिष्ठा जास्त होती. राजकारणातून समाजकारण हे त्यांचे सूत्र होते. त्यांचे चारित्र्य ही निर्मळ होते. गावात त्यांचा खूप नावलौकिक होता. आणि हेच बाळकडू