अजब लग्नाची गजब कहाणी (भाग २)

  • 13.9k
  • 9.8k

माईंनी अण्णांच्या कानावर त्यांचं रुख्मिणी आजींसोबत झालेलं बोलणं घातलं..अण्णांना ही आनंद झाला पण प्रश्न त्यांच्या लाडकीच्या आयुष्याचा होता म्हणून सगळी शहानिशा केल्या शिवाय ते पुढील बोलणी करणार नव्हते.अण्णांनी जानकीला त्यांच्या खोलीत बोलवले.." अण्णा बोलावलं तुम्ही?" जानकी म्हणाली.." हो ..बस इथे माझ्यासमोर " अण्णा म्हणाले.." काय झालंय अण्णा ,तुम्हाला काही बोलायच आहे का माझ्याशी" अण्णांचा चिंतेत असलेला चेहरा बघून जानकी म्हणाली"जानू बाळा तुझ्यासाठी एक स्थळं आलंय आणि येत्या रविवारी ते आपल्या घरी यायच म्हणतं आहेत" अण्णा म्हणाले" अहो अण्णा काय इतकी घाई माझ्या लग्नाची..वर्षभरात 3 मुलं येऊन गेलेत मला पाहायला..मला त्या कांदेपोहे कार्यक्रमाचा कंटाळा आलाय हो अण्णा.." जानकी काहीशी वैतागून म्हणाली.."