अजब लग्नाची गजब कहाणी (भाग १)

  • 19.2k
  • 11.7k

" अरु, जयु,मनु अग कुठे आहात ग सगळ्या, लवकर या बरं इकडे" माई फोनवरच बोलणं संपवून मोठ्याने आवज देत म्हणाल्या ."माई अहो काय झालं??काही हवंय का तुम्हाला?" अरुताई म्हणाल्या." मला काहीही नको ग ..आता माहिती का कुणाचा फोन होता?? माझी बालमैत्रीण रुख्मिणी चा " माई म्हणाल्या.."काय सांगताय काय माई..अहो तुम्ही रुख्मिणी मावशींबद्दल नेहमी सांगत असता.. आणि बरेच वर्षात तुमची गाठ भेट सुध्दा नाही मग हे अचानक कस घडलं." अरुताई आश्चर्याने म्हणाल्या .." अग ..आपण नाही का जानूच नावं नोंदवलं विवाह मंडळात .तिच्याही नातवाच नोंदवलं आहे त्यात नाव तिथेच त्यांनी आपल्या जानूची सगळी माहिती वाचली आणि फोन केला ..बघ न काय