जव्हार डायरिज - पार्ट ३

  • 6.9k
  • 3.1k

रात्री गाढ झोप लागल्यामुळे सकाळी उठल्यावर छान फ्रेश वाटत होतं.. आज दोन तीनच पर्यटन स्थळे बघायची असल्यामुळे आम्ही आरामात आवराआवर केली.. नाश्त्याची वेळ झाल्यामुळे आधी नाश्ता करून घेतला.. नाष्ट्यामध्ये ब्रेड ऑमलेट, भुर्जी , पोहा असे दोन तीन प्रकार होते.. आम्ही पोटभर नाश्ता करून पॅकिंग करायला घेतले.. आता चेक आऊट करून , दोन तीन पॉइंट बघून मग परत मुंबई असा आमचा प्लॅन होता.. प्रकृति ॲग्रो फार्म पॅकेजमध्ये राहणे, दोन वेळचे जेवण, नाष्टा आणि संध्याकाळचा हाय टी याचा समावेश होता.. तुम्ही एकस्ट्रा काही मागवले तर आपल्याला त्याचे बिल द्यावे लागते. तुमचा ड्रायव्हर असेल तर त्याचे पण एकस्ट्रा पैसे मोजावे लागतात.. आम्ही आवराआवर