गुंजेचा पाला

  • 8.1k
  • 2.7k

प्रेमाचा ओलावा टिकवून ठेवायला सांगणारा - 'गुंजेचा पाला' जेष्ठ ग्रामीण साहित्यिक श्री. बबन पोतदार यांनी लिहिलेल्या व पुष्पक प्रकाशन, पुणे यांनी 1985 साली प्रथम प्रकाशित केलेल्या 'गुंजेचा पाला' या कथासंग्रहाच्या आत्तापर्यंत एकूण सहा आवृत्त्या निघाल्या आहेत. सोबतच 'आक्रित' व 'एका सत्याचा प्रवास' या कथासंग्रहांच्याही काही आवृत्त्या निघाल्या आहेत. गुंजेचा पाला या पुस्तकाबद्दल आजवर खूप ऐकून होतो. पुण्यात‌ झालेल्या एका कवी संमेलनात एका नामवंत कवीने हलाखीच्या परिस्थितीत जवळ पैसे नव्हते, पण हे पुस्तक वाचण्याची ओढ होती. या ओढीने 'गुंजेचा पाला' हे पुस्तक एका नातेवाईकांकडून चोरून आणून वाचलं. ही आठवण खूद्द त्या कवीने भर सभागृहात उपस्थित कवी, साहित्य रसिकांच्या समोर कबूल केली.