सा य ना ई ड - (प्रकरण १४ आणि १५ )

  • 8.7k
  • 4.6k

सा य ना ई ड प्रकरण १४. आणि १५ १४- पाणिनी तुरुंगातल्या एका खोलीत अनन्या गुळवणी ला भेटायला आला होता. पडद्याच्या पलीकडे ती शांतपणे आणि समाधानी चेहेऱ्याने बसली होती. नेहेमी पेक्षा जास्तच सुंदर दिसत होती.“ मला तुम्ही साक्षीदाराच्या पिंजऱ्यात उभे करणार आहात ? “‘’ एक गोष्ट स्पष्ट पणे ध्यानात घे, तुला पिंजऱ्यात उभं केलं तर आईने तुझ्या कडे दिलेल्या त्या पत्रा बद्दल तुला सांगावच लागेल. त्यामुळे त्यात काय मजकूर होता हे मला समजायला हवं.” पाणिनी म्हणाला.“ मी तुम्हाला सांगितलं ना, की मी ते कधी ही कोणालाही सांगणार नाही.”“ तुझा वकील म्हणून मला ते माहीत असणे गरजेचे आहे.तुला समजत नाहीये की परिस्थिती किती