युवाप्रेरणा- पुस्तक परीक्षण

  • 8.7k
  • 3k

तरूण, तरुणींची मनं पेटवत ठेवणारी क्रांतीमशाल, म्हणजे 'युवाप्रेरणा' १२ जानेवारी हा 'राष्ट्रीय युवक दिन' म्हणून साजरा केला जातो. या दिवसाचे औचित्य साधून प्रा. कवी देवबा पाटील यांनी आपला 'युवाप्रेरणा' हा कवितासंग्रह प्रकाशित केला आहे. हा कवितासंग्रह १४ जानेवारीला, म्हणजे मकरसंक्रांतीच्या सणा दिवशी माझ्या हातात आला. रजिस्टर पोस्टाने आलेल्या पाकिटातून जेव्हा मी पुस्तक बाहेर काढले व पुस्तकाचे छानसं मुखपृष्ठ पाहून माझं मन प्रफुल्लित झालं. पुस्तकाचे मुखपृष्ठ पाहिल्यानंतर जे चित्र दिसते, त्यात पानाफुलांच्या मध्ये उंच हिरवी झाडे आणि त्यापेक्षाही उंच युवा जोश दर्शवणारी झेप घेणारा तरूण. आशेचे, यशाचे आकाश दोन्ही हातांनी कवेत घ्यायला तरूण निघालेला आहे. तरुण जिथून उंच झेप घेत आहे,