सा य ना ई ड - (प्रकरण १२ आणि प्रकरण १३)

  • 8.3k
  • 4.3k

सा य ना ई ड प्रकरण १२जवळ जवळ मध्य रात्र झाली होती सौम्या तिच्या खुर्चीत बसून पाणिनी कडे घाबरून बघत होती . ते दोघे बाहेरून जेवून ऑफिस मधे आल्यापासून पाणिनी सतत येरझाऱ्या घालत होता .बाहेरचे जेवण सुद्धा त्यांना चवीने घेता आले नव्हते. “ घरी जा सौम्या” पाणिनी म्हणाला. तिने मानेने नकार दिला.” आपल्याला काही कळे पर्यंत मी जाणार नाही.“ सव्वा बारा वाजून गेले आहेत. संध्याकाळपासून पोलीस जयकर च्या घराजवळ ठाण मांडून बसले आहेत.साडे दहा वाजता त्यांना संशय यायला सुरुवात झाली की त्याने त्यांच्या हातावर तुरी दिली