गरज..

  • 9.2k
  • 3.5k

अर्चना... पाच वाजले उठ लवकर..हो ... उठते...मला रोज पहाटे पाच वाजता उठायची सवयच लागली होती. उठल्यानंतर अंघोळ करायची आणि मग गल्लीतल्या नळावर पाणी भरण्यासाठी रांगेत जाऊन उभी रहायची. रांग मोठीच असायची. आजही रांग मोठीच होती. आज माझा शाळेत सहामाही परीक्षेचा पहिला पेपर होता. माझ्या मनात रांगेत फक्त एकच विचार होता. आज पेपर आहे आज तरी लवकर काम आवरु दे..अर्चना.. पुढे हो गं.. माझा हंडा ठेवते हा तुझ्या मागे..(माझंच लक्षच नव्हतं..)अगं... अर्चना... अर्चना... कुठे आहे लक्ष तुझं बाळा??सॉरी हा आजी काही बोललात का????काय गं काय झालं..??? तु कसल्या विचारात आहेस..??काही नाही ओ आजी सहजच...तब्येत ठीक आहे ना तुझी ?? ती भवानी