सा य ना ई ड - (प्रकरण ११)

  • 8.7k
  • 4.3k

सा य ना ई ड प्रकरण ११पाणिनी ने आपली गाडी हम रस्त्याला वळवली. “ कुठे चाललोय आपण?” जयकर ने विचारले.“ अत्ता तरी आपण जिथे जास्तीत जास्त गर्दी आणि वर्दळ असेल अशा ठिकाणी चाललोय.पोलीस तुला शोधताहेत , बहुतेक मलाही शोधात असावेत.म्हणून मी विचार केला की तुला बरोबर घ्यावं आणि पोलिसांनी अनन्याला शोधण्यापूर्वी आपण तिला शोधण्याचा प्रयत्न करावा. आता मुख्य अडचण अशी आहे की आपण हे प्रकरण हाताळण्याचा काही मार्ग जोवर शोधत नाही तो पर्यंत पोलीसाना तुझ्या पर्यंत कसे पोचू द्यायचे नाही.”“ काय पद्धत आपण वापरायची?’’“ मला हे उत्तर माहीत असतं तर अशा प्रकारे आपण गाडीतून भटकत बसलो नसतो. एक गोष्ट तुला सांगू