नक्षत्रांचे देणे - २८

  • 7.4k
  • 1
  • 4.7k

‘क्षितिजची गाडी सरळ पुढे जाऊन एका मोठ्या झाडावर आदळली होती. त्याच्या डोक्यालाही बरीच दुखापत झाली होती. त्यात गाडीमध्ये लिक्विड गळती सुरु झाली होती. कोणत्याही क्षणी स्फोट झाला असता. त्याने हातात असणारा मोबाइल शक्य तितक्या दुर फेकून दिला आणि गाडीचा तुटलेला दरवाजा ढकलून तो कसाबसा बाहेर पडला. गाडीने पेट घेतला होता. स्फोट होणार हे नक्की होते. आणि एवढ्या जवळ गाडी असल्याने क्षितीज त्या स्फोट मध्ये सापडण्याची दाट शक्यता होती. त्याच्यापासून काहीच अंतरावर पुढे पडलेला त्याचा मोबाइल वाजत होता, भूमीचा फोन होता. तो घेण्यासाठी त्याला उठता येत नव्हते. होती नव्हती ती सगळी शक्ती एकवटून त्याने मागच्या दिशेला झेप घेतली, धाडकन मागच्यामागे जाऊन