सा य ना ई ड - (प्रकरण १०)

  • 8.7k
  • 4.7k

सा य ना ई ड प्रकरण १० बलदेव गेल्या नंतर जवळ जवळ तासभर पाणिनी येरझाऱ्या घालत होता. सौम्या सारखी घड्याळाकडे बघत होती.शेवटी तिने विचारले, “ काम करणाऱ्या स्त्री ला खाण्यासाठी तरी संधी मिळणार का?”आपल्या चालण्याच्या लयीत कोणताही बदल न करता तो म्हणाला.” आपण खायला मागवू इथे. डॉ.डोंगरे यांना पोलिसांनी संपर्क करण्यापूर्वी त्यांचं व माझं बोलणे होणे आवश्यक आहे. तसचं अनन्या गुळवणी ची भेट होणे ही महत्वाचे आहे.तुला काय वाटत सौम्या, निमिष जयकर ला ती कुठे आहे हे कसे समजले असेल?”“ तिने , मी जाताच लगेच त्याला फोन केला असेल. ती मुलगी म्हणजे एक कोडेच आहे.मला वाटतंय तिच्या मनात काहीतरी चाललंय.”ओजस ने दारावर