बेला - खाण मालकीण

  • 10.8k
  • 3.6k

वरच्या लगेज बाॅक्समध्ये सामान ठेऊन मी माझ्या खिडकी शेजारील आसनावर स्थानापन्न झालो. वास्तविक, विमानप्रवासात मला कडेचे , गॅंगवे शेजारचे आसन आवडते. तीथे उन्मेष बसला होता. विनंती करून मी आसनांची अदलाबदल करून घेतली. आता दोघांच्या मधे गोपी होता. मी आणि उन्मेष पुण्याहून ,व गोपी मुंबई हून दिल्लीत आलो होतो. आम्ही आता कझाकस्तान ची राजधानी अस्ताना. (आताचे नांव: नूर सुलतान) येथे निघालो होतो. उन्मेष हा चाळीशीचा उमदा उद्योजक होता. स्वतः च्या व्यवसायाचे विस्तारिकरण आणि विवीधिकरण यासाठी पूर्ण जोमाने प्रयत्न करतोय. त्याच संदर्भात, गोपीच्या मध्यस्थीने त्याला कझाकस्तान मध्ये एक, सध्या बंद असलेली, सुवर्णखाण विकत अथवा चालविण्यासाठी घ्यावयाची आहे. हा व्यवहार पूर्ण करण्यापूर्वी,ही