जव्हार डायरीज - पार्ट १

  • 8.6k
  • 4k

आम्ही नुकतीच फोर व्हीलर घेतली होती.मुख्य म्हणजे मी महिन्याभरातच गाडीवर बऱ्यापैकी हात साफ करून घेतला होता. आत्मविश्वास दुणावला होता की आपण कार घेवून लाँग ड्राईव्ह करू शकतो. त्यामुळे मी आणि अनिल ने जवळचेच वन नाईट स्टे आणि दुसऱ्या दिवशी परत घरी येवू असे स्पॉट्स शोधायला सुरुवात केली. नुकताच पावसाळा संपत आला होता . बाहेरचे वातावरण लाँग ड्राईव्ह साठी एकदम झकास होते. बरीच शोधाशोध केल्यावर आम्ही जव्हार जायचे ठरवले. कांदिवली वरून अगदी १२०-१३० कि.मी. असल्यामुळे मला गाडी चालवण्यासाठी पण सोयीस्कर. आता डेस्टिनेशन तर फायनल झाले. राहायचे कुठे? हा पुढचा प्रश्न. लगेच गुगल ची मदत घेतली. जव्हार हा आदिवासी भाग