(आपण मागच्या भागात पाहीलं की राधिकाची बालमैत्रीण सुमी आणि तीचा मुलगा कृष्णा येतो... दोघीही एकमेकींना ओळखतात... सुमी खूप बडबडया स्वभावाची असते, त्यामुळे तिची बडबड ऐकून सगळे तिला हसत असतात... थोड्या वेळाने भीमा तिथे येऊन पोहोचतो आणि सगळ्यांची माफी मागतो... अजयची आई रागाने त्याच्या कानाखाली मारते... भीमा सगळ्या वाईट गोष्टी सोडून देण्याचं वचन सुमीला आणि सावित्रीमायला देतो... आता पुढे...) सगळं आनंदाचं वातावरण झालं होतं... आपल्या माणसांनी सगळं घर भरलेलं होतं म्हणून कुसुमला मनाला खूपच समाधान वाटत होतं... किचनमध्ये राधिका, सुमी, काही नोकर सगळे जेवणाची तयारी करत होते... सुमीची बडबड चालूच होती... राधिका - "सुमी... गौरी, केसर आणि कोमल आता कुठे