श्री संत एकनाथ महाराज ७, नाम महात्म्य.

  • 10.9k
  • 3.5k

श्री संत एकनाथ महाराज नाम महात्म श्र्लोक ३७ न ह्यतः परमो लाभो, देहिनां भ्राम्यतामिह । यतो विन्दत परमां शान्तिं नश्यति संसृतिः ॥३७॥ जे जन्ममरणांच्या आवर्तीं । पडिले, संसारीं सदा भ्रमती । त्या प्राणियां कलियुगाप्रती । कीर्तनें गती नृपनाथा ॥२२॥ कलियुगीं कीर्तनासाठीं । संसाराची काढूनि कांटी । परमशांतिसुखसंतुष्टीं । पडे मिठी परमानंदीं ॥२३॥ ऐसा कीर्तनीं परम लाभु । शिणतां सुरनरां दुर्लभु । तो कलियुगीं झाला सुलभु । यालागी सभाग्यां लोभु हरिकीर्तनीं ॥२४॥ 'कीर्तनास्तव चारी मुक्ती । भक्तांपासीं वोळंगती । हें न घडे ' कोणी म्हणती । ऐक ते स्थिती नृपनाथा ॥२५॥ कीर्तनीं हरिनामाचा पाठा । तेणें देवासी संतोष मोठा । वेगीं