नक्षत्रांचे देणे - २०

  • 7.3k
  • 4.6k

माईंचा फोन येऊन गेल्यापासून भूमीचे चित्त थाऱ्यावर नव्हते. ' त्या म्हणाल्या काही दिवसांनी विभास भारतात येणार आहे. पण का? नाना आणि माईंनी त्याच्याशी असलेले सगळे संबंध तोडून टाकले. माझ्याशी तर त्याचा काही संबंध आलाच नाही.  मग सगळी सत्य परिस्थिती डोळयासमोर असूनही तो कुणासाठी येतोय इकडे?'  याचा विचार करत ती बसली होती. एवढ्यात दाराची बेल वाजली. पाहते तर निधी दारात उभी होती. सकाळीच तिचा फोन आला होता. आज येणार आहे म्हणून. ''हाय. कशी आहेस?'' तिला मिठी मारत भूमी म्हणाली. ''मी मस्त ग. तू?'' निधी खुर्चीवर बसत भूमीला विचारत होती. ''मी मजेत. बस मी पाणी आणते.'' म्हणत भूमी आता गेली किचन मधून