नक्षत्रांचे देणे - १७

  • 7.4k
  • 4.3k

''बाय द वे... तुम्हाला फोन घ्यायला आवडत नाही का?'' एवढा वेळ पसरलेली शांतता भंग करत भूमी फोनकडे बघत क्षितिजला विचारात होती.''का?'' क्षितीज ''केव्हापासून तुमचा फोन वाजतोय, तुम्ही लक्ष देत नाही.'' भूमी''ओ, पप्पांचा फोन आहे. ते विचारणार कुठे आहेस? आणि मला ते सांगायचं नाहीय. म्हणून नाही उचलतं. '' क्षितीज''का?'' भूमीने आश्चर्याने त्याला विचारले. ''ते कुठे सगळ्या गोष्टी मला सांगतात.'' तो मिश्किल हसला.''कोणाचा फोन आला, तर बोलून तरी बघावं, दुसर काही महत्वाचं काम असू शकतं.'' भूमी त्याला समजावत होती. तिच्याकडे बघत क्षितीज काहीतरी विचार करत होता आणि पुन्हा फोन वाजला. त्याने लगेच उचलून तो कानाला लावला.''हॅलो पप्पा.'''हॅलो मला महत्वाचं एक काम आहे, सो कंपनीतून