नक्षत्रांचे देणे - १६

  • 7.3k
  • 4.4k

पावसाचा जोर ओसरलेला नव्हता. त्यामुळे सगळीकडे पाणी भरलेले होते. कॅब सुद्दा मिळणे मुश्किल होते. काय करावं सुचेना. भूमी खूप वेळ वाट बघत कंपनीच्या बाहेरील एरियात थांबली होती. इथे तसे कोणीही विशेष ओळखीचे नसल्याने सांगणार तरी कोणाला? बराच वेळ ती इथे उभी असल्याने ऑफिस रिसेप्शनिस्टने हे ओळखलं असावा, तिने आत फोन केला आणि या बद्दल सांगितलं. ‘’मॅम सर येतायत, ते सोडतील तुम्हाला.’’ असं म्हणत तिने हातातला फोन ठेवला, भूमी तिच्याकडे प्रश्नार्थक नजरेने बघत होती एवढ्यात मिस्टर सावंत आणि क्षितीज बाहेर आले होते. ''हेवी रेन सुरु आहे. सगळे रोड अल्मोस्ट ब्लॉक आहेत. शक्य असेल तर तुम्ही ऑफिस मध्ये वरती थांबू शकता. काही