प्रेमगंध... (भाग - ३३)

  • 7.9k
  • 1
  • 4k

(आपण मागच्या भागात पाहिलं की अजयला डिस्चार्ज देण्यात येतो आणि कुसुम सगळ्यांना आपल्या घरी घेऊन जाते.... वाड्याचा थाटमाट बघून सगळेच अवाक होतात... कुसुम अजयच्या घरच्यांना राधिकाचे बाबा आणि तिच्याबद्दल सगळं सांगते... अजयची आई आल्यापासून खूप शांत शांत असते... अजयचे बाबा तिला जाऊन समजावतात... आता पुढे...) दुपारच्या जेवणाची सगळी तयारी झाली होती... कुसुमने सगळ्यांना जेवण करण्यासाठी बाहेर बोलवलं... सगळे येऊन जेवायला बसले... जेवणाचा सगळा घमघमाट पसरला होता... कुसुम, राधिकाची आई आणि राधिका सगळ्यांना आग्रह करून वाढत होत्या... कुसुम - "आज घाईघाईत साधंच जेवण बनवून वाढलं तुम्हाला... गोड मानून घ्यावं सगळ्यांनी..." अजयचे बाबा - "अहो ताई, हे साधं जेवण म्हणावं का...?