नक्षत्रांचे देणे - १४

  • 7.9k
  • 1
  • 4.9k

मेघाताई आणि मिस्टर सावंत यांचं बोलणं सुरु होत. आज भूमी ऑफिस जॉईन करतेय, हे समजल्यावर मेघाताईंना कितीतरी आनंद झाला. क्षितीज आणि त्याच्या पप्पांचे बदलणारे सूर त्यांना आता स्पष्ट दिसत होते. म्हणून त्यांनी मुद्दाम विषय काढला. ''संजय क्षितिजमध्ये झालेला बदल तुमच्या लक्षात येतोय का? तो आता एकटा-एकटा नाही वाटत. पहिल्यापेक्षा जास्त ऍक्टिव्ह वाटतो. आणि पॉसिटीव्हही '' ''होय, आणि ते त्याच्यासाठी आणि कंपनीसाठी चांगलं आहे.'' ऑफिसला जाण्याच्या तयारीत असलेले मिस्टर सावंत मेघाताईंना म्हणाले. ''भूमीला असं त्याला न सांगता जॉईन करण्याचं कारण समजेल का?'' मेघाताईंनी डायरेक्ट विषयाला हात घातला. ''भूमी ही कंपनीच्या हिताच्या दृष्टीने असलेली माझी चॉईस आहे, क्षितिजला मला इथे इन्व्हॉल्व्हड करायचं