सा य ना ई ड - (भाग ६)

  • 8.4k
  • 4.6k

सा य ना ई डप्रकरण ६पोलीस स्टेशन मधे आल्यावर खून,हत्या, वध अशा विषया संबंधित विभागात पाणिनी आला.दार ढकलले आणि आत आला. “ इन्स्पे. तारकर आहे का आत? दारावरच्या हवालदाराला त्याने विचारले.इन्स्पे. तारकर आणि पाणिनी जिवाभावाचे मित्र होते पण दोघांचे कामाचे स्वरूप परस्परांशी विरोधी असल्याने,त्यांच्यात कायम वाद होत असत. दोघेही आपल्या कर्तव्यात कसूर करत नसत. तत्वाचा प्रश्न येई तेव्हा मैत्री बाजुला ठेऊन भांडणे करीत. पाणिनीने स्वतःच्या हुशारीने सोडवलेल्या अनेक प्रकरणात यशाचे श्रेय तारकर ला दिले होते पण त्याचा बोभाटा केला नव्हता. याची सुप्त जाणीव तारकर ला होती आणि त्या मुळे पाणिनी विषयी त्याला आदर होता आणि त्याच वेळी नको त्या प्रकरणात