आणी निसर्ग मानवाला फोन करतो,जेव्हा मानव निसर्गाचा फोन उचलायला विलंब करतो.. तेव्हा निसर्ग आपल्या प्रेमळ, पण जरा भावुक होऊन दबलेल्या आवाजात बोलू लागतो, काय रे मानवा फोन तर उचल.. किती वेळचा फोन करतोय तुला. तुम्ही सगळे तुमच्या मग्न, सुखी आणी आनंदी जीवनात एवढे व्यस्त होऊन गेलात की तुम्हा लोकांना आमच्याकडे पाहायला सुद्धा वेळ नाही आहे.... कित्येक वर्षांपासून पाहतोय.. तुम्ही हवा तसा माझा वापर करून घेता... तुम्हाला जिथे गरज भासली तिथे मी अगदी आनंदी होऊन तुमच्या मदतीला धावून येतो. मला आवडतं तुमच्या सोबत राहायला.. पण हल्ली तुम्ही पूर्णपणे दुर्लक्ष करताय माझ्यावर. माझं आणि तुमचं नातं जन्मोजन्मीचं. माझ्या सानिध्यात अनेक प्राणी,