सा य ना ई ड प्रकरण ५हेमंत कोरगावकर, हा रसायन शास्त्र विषयक सल्लागार होता.डोक्यावर घट्ट बसणारी आणि कपाळा पर्यंत ओढलेली टोपी ,बारीक ,चमकदार डोळे,त्याच्या जाड चष्म्याच्या आतूनही दिसत होते. चेहेरा, चंद्रा सारखा गोल गरगरित होता. आपुलकीने हात पुढे करून त्याने पाणिनी पटवर्धन शी हस्तांदोलन केले.“ वा: वा: वा: पाणिनी पटवर्धन, किती तरी दिवसांनी तुझ्यासाठी काम करण्याची संधी मिळाली ! नाही का ? ““ अगदीच फार काळ नाही, दोन वर्ष असतील.”“ खूप काळ गेलाय. काय विशेष या वेळी ? ““ कोरगावकर, हा झुल्पीपरकारनावाचा मुलगा आहे.त्याला काहीतरी सापडलंय.त्यानेच तुला सांगू दे स्वत:च्या तोंडून कुठे मिळाली आहे ही वस्तू.”“ हो हो चालेल ना. “