अ मेमोरेबल डे इन सेंट्रल गोवा

  • 6k
  • 2.3k

आज सकाळी मात्र कोणालाच लवकर जाग आली नाही. सगळेजण अगदी आठ वाजेपर्यत झोपून राहिले. जाग आल्यावर पण बिछान्यात लोळत पडावेसे वाटतं होते दहा वाजता विल्सन येणार होता त्यामुळे साडेआठ नंतर मात्र मी सगळ्यांना आटपायला सांगितले. आज वेळ कमी असल्यामुळे आम्ही चहा आणि नाष्टा एकत्रच उरकून घेतला. ठरल्याप्रमाणे विल्सन गाडी घेवून आला. आज आम्ही सेंट्रल गोवा बघायचं ठरवलं होतं. आजचा सुरवातीचा प्रवास पण छान निसर्गाने नटलेल्या रस्त्यांवरून सुरू झाला. आमच्या गाडीने सपाट रस्ता सोडून एक टेकडी चढायला सुरुवात केली. रस्ता घाट वळणाचा होता. दोन्ही बाजूला जंगल आणि घनदाट झाडी. दिवसाढवळ्या सुध्दा निर्मनुष्य