नवरा बायकोचे रुसवे-फुगवे...१३

  • 25.3k
  • 4
  • 7.1k

तर मित्रांनो तुम्ही मागच्या भागात पाहिलंच सासरवाडी जाऊन माणूस कसा लंबा लागतो, सालीबाईच रागवण म्हणजे आपल्या खिशाला फसवण... २४०० रुपयाचा लॉन्ग ड्रेस घेऊन बसलेला फटका.... आणि आता पुढे......________________________________________खिशाला दणका, पण कृपाच्या चेहऱ्यावर हास्य लॉन्ग ड्रेस मुळे आल......असो पैसा गेला पन ती आनंदी झाली...त्यात पावसाचं वातावरण झाल्यामुळे सासरे बुआ, रितू, आणि तिच्या तिन्ही भावांचे फोनवर फोन यायला लागले. एक झाला कि एक कॉल रिसिव्ह करत होतो. तेव्हा कळलं लोक सासरवाडी मध्ये अधून-मधून का जातात.भलताच मान, हव ते खायला, वरून प्रत्येक जण काळजी घेतो, सकाळी उठल्यापासून तर संध्याकाळी झोपेपर्यंत जे लागतं ते आटोमॅटिक मिळतं, आता माझ्या लग्न न झालेल्या भावांनो घाई करु नका