भगवान प्रभू श्रीरामचंद्र एक कुशल संघटक होते. असे म्हटले तर कोणाचे कान टवकारले जायला नकोत . ही गोष्ट खरी आहे . प्रभू श्रीरामचंद्र संघटना तयार करण्यात व प्रशिक्षण देण्यात उत्तम व्यक्तिमत्व होते. श्री प्रभू रामचंद्र समाजातील वेगवेगळ्या लोकांना एकत्र आणून त्यांच्या सहाय्याने आपल्या अपहरण झालेल्या प्रिय पत्नीचा शोध घेत होते. त्यामध्ये वानर सेना आघाडीवर होती. श्री हनुमान बलशाली शक्तीचे प्रतीक होते. वाली होते. सुग्रीव होते. या सर्वांची संघटना तयार करायला प्रभू रामचंद्रांना खूपच कष्ट पडले असणार. वाली आणि सुग्रीवाला आपल्याकडे वळवण्यात ते यशस्वी झाले होते. इतकेच नव्हे तर खारुताईला सुद्धा त्यांनी आपल्या कडे आकर्षित केले होते. खारुताई