रात्री अगदी गाढ झोप लागल्यामुळे सकाळी लवकर जाग आली. दरवाज्यावरचा पडदा बाजूला करून बाहेर बघितलं तर बाहेर निरव शांतता पसरली होती. मध्येच पक्ष्यांचा किलबिलाट कानावर पडत होता. तेवढ्यात रस्त्यावरून हॉर्न वाजवत एक सायकलवाला जाताना दिसला.तो काहीतरी विकत होता. मुंबईला असं हॉर्न वाजवत इडली डोसावाले सायकल वरून येतात. मला वाटलं येथे पण असच काहीसं आहे का ? म्हणून चौकशी केली तर समजलं की तो पाववाला आहे. त्याच्याकडे आपल्यासारखे छोटे पाव होते आणि गोल आकाराचे मोठे पाव पण होते. एक पाव दोन तीन जण सहज खावू शकतील एवढा मोठा होता. पाव बघून आम्हाला चहा पिण्याची तलफ झाली. मग